Corrupt Officer: औरंगाबादमधील लाचखोर अधिकाऱ्यांची पाहा यादी

औरंगाबाद – अनेकदा सरकारी अधिकारी, कर्मचारी यांनी विविध कामांसाठी लाच घेतल्याची प्रकरणे समोर येतात. या घटनानांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. खरं तर जनतेची कामे करण्यासाठीच या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मात्र आपल्या अधिकाराचा अनेकदा काही अधिकारी गैरफायदा घेतात. नागरिकांकडून विविध कामांसाठी विविध विभागातील अधिकारी लाच घेतल्याची प्रकरणे आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात कोणत्या विभागाच्या अधिकाऱ्याने किती लाच घेतली याची माहिती जाणून घेऊया..
– गेल्या महिन्यात जीन्सी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अशफाक शेख यांनी एक लाख रुपयांची लाच घेतल्याचे समोर आले होते. लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांनी शेखला लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले होते.
– औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक नगर रचनाकार म्हणून कार्यरत असलेल्या पवन परिहार यांच्यावर मागील आठवड्यात लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी तडजोडीअंती 1 लाख रुपये लाच स्वीकरण्याचे मान्य केल्याचे पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तपासणीत सापडले.
– पैठणचे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यावर देखील एसीबीने कारवाई केली होती. वाळूचा उपसा करणे आणि दोन हायवाद्वारे वाळू वाहतूक करण्यासाठी तहसीलदार शेळके यांनी एका खासगी व्यक्तीच्या मार्फत महिन्याला 1 लाख 30 हजार रुपयांचा हप्ता देण्याची मागणी केली होती. पंच साक्षीदारांच्या समक्ष लाचेची मागणी केल्यानंतर त्यांच्यावर पैठण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
– तसेच वाळूची वाहतूक करण्यासाठी दीड लाखाची लाच घेताना तहसीलदार किशोर देशमुखवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली होती.
– गेल्या महिन्यात उपविभागीय जलसंधारण अधिकारी ऋषिकेश प्रल्हादराव देशमुख यांना 8 लाख 53 हजार रुपये घेतांना पकडले होते.
– बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी सादिक सिद्दीकीने एका गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी तीन लाखाची मागणी केली होती. त्यानंतर औरंगाबादच्या लाचलुचपत विभागाने त्याच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला होता.
– पैठणचे तत्कालीन तहसीलदार महेश सावंत यांना शेतकऱ्यांकडून 1 लाखाची लाच घेतांना पकडण्यात आले होते. विशेष म्हणजे, राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना आदर्श तहसीलदार पुरस्कार मिळाला होता.
– जालना येथील पाटबंधारे विभाग कार्यालय येथे कार्यरत बालाप्रसाद एकनाथराव रनेर आणि विजय हरीसिंग सोळंकी यांच्यावर दोन दिवसांपूर्वी लाचेची मागणी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी 11 हजारांची लाच मागीतीली होती.




