“तुमचं प्रेम यु टर्न मारून परत येईल… प्रेमात लागलेल्या बांबूची गोष्टी” मजेदार TEASER एकदा पहाच…

मुंबई – प्रेमाचा इतिहास हेच सांगतो की, खांद्यासाठी बांबू लागतो आणि बांबू लागला की, कोणाचा तरी खांदा हा लागतोच. तुमचे गेलेले प्रेम यु टर्न मारून परत येण्यासाठी प्रेमाचे सायन्स पाळणे खूप गरजेचे आहे. प्रेमात बांबू कसे लागतात, यांची गोष्ट सांगणाऱ्या ‘बांबू’ चित्रपटाचे टीझर नुकतेच प्रदर्शित झाले. खुसखुशीत लव्हस्टोरी असलेला हा टीजर खूपच रंजक आहे. येत्या २६ जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
विशाल देवरूखकर दिग्दर्शित ‘बांबू’च्या टीझरमध्ये तरूण -तरूणी बांबूच्या बनातून जाताना दिसत आहेत. आता त्यांच्या प्रेमकहाणीत नेमके काय ‘बांबू’ लागले आहेत, हे चित्रपट आल्यावरच कळेल. अंबर विनोद हडप लिखित या चित्रपटात कलाकार नेमके कोण आहेत हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. तरूणाईला हा चित्रपट त्यांच्या आयुष्याशी निगडित आहे असाच वाटणारा आहे असे दिग्दर्शकाचे म्हणणे आहे.
क्रिएटिव्ह वाईब प्रस्तुत, तेजस्विनी पंडित, संतोष खेर यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी गडबड,लोच्या किंवा बांबू लागणे असे प्रकार घडतच असतात त्याचीच ही कथा असल्याचे टीजरवरून तरी वाटते. प्रेमाची झालर असलेला हा टीजर खूपच मजेशीर असल्याने ट्रेलर आणि चित्रपटाची उत्कंठा आता चांगलीच वाढली आहे.


