दिल्ली विधानसभेत गोंधळ; आतिशी यांच्यासह १२ आमदारांचं निलंबन

Delhi News | दिल्ली विधानसभेतून आपच्या नेत्या आतिशी यांच्यासह १२ आमदारांचं निलंबन करण्यात आले आहे. विशेष अधिवेशनदरम्यान आम आदमी पार्टीच्या आमदारांनी जोरदार गदारोळ केला. त्यानंतर 12 आमदारांचं एक दिवसासाठी निलंबन करण्यात आले आहे.
दिल्ली विधानसभेत आज कॅगचा अहवाल समोर येणार आहे. या अहवालात शीशमहलच्या दुरुस्ती आणि देखभाल खर्चाचे तसेच नुतनीकरणाच्या खर्चाचे तपशील आहेत. ज्यावरुन कॅगने आधीच्या सरकारला झापलं आहे. त्यावरुन आपच्या आमदारांनी गदारोळ केला. तसेच दिल्ली विधानसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हटवून पंतप्रधान मोदींचा फोटो त्या ठिकाणी लावण्यात आला.
या दोन्ही मुद्द्यांवरुन गदारोळ सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठे आहेत का? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी केला आहे. यावेळी स्पीकर विजेंद्र गुप्ता यांनी अतिशी यांच्यासह एका दिवसासाठी 12 आमदारांना निलंबित केले. तसेच राज्यपालांच्या भाषणादरम्यान अडथळा निर्माण केल्याच्या कारणास्तव विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी आधी मार्शल्सला बोलवून गोंधळी आमदारांना बाहेर घेऊन जाण्याचे आदेश दिले.
#WATCH | Delhi: AAP MLA Gopal Rai also suspended from the legislative assembly by Speaker Vijender Gupta.
Source: Vidhan Sabha pic.twitter.com/qfzBQDLmu9
— ANI (@ANI) February 25, 2025
भाजपमध्ये अहंकार निर्माण झाला. मोदी हे आंबेडकरांची जागा घेऊ शकत नाही. आम्ही ते होऊ देणार नाही, असे आतिशी यांनी ठणकावले. सध्या आपचे आमदार विधानसभेच्या बाहेर निषेध करत घोषणा देत आहेत. त्यांच्या हातात आंबेडकरचा फोटो देखील आहे. निलंबित झालेल्या आमदारांमध्ये सोमदत्त, जननैल सिंह, मुकेश अहलावत आणि चौधरी जुबैर यांचा समावेश आहे.
तर दुसरीकडे आपच्या आरोपावर भाजपाचे म्हणणे आहे की, भगतसिंग आणि बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो काढले नाही तर, ते दुसर्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा:
49 वर्षीय सुश्मिता सेन कधी लग्न करणार? चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत अभिनेत्री म्हणाली…





