Pune Municipal Elections Result 2026 | पुण्यातील प्रभाग २५ मतमोजणी केंद्रावर प्रचंड गोंधळ झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली ठोंबरे आक्रमक झाल्या. ईव्हीएम नंबर मॅच झाले नसून, मशीन बदलल्याचा रूपाली ठोंबरे यांनी आरोप केला. मशीनचे नंबर मॅच होत नसल्याने रूपाली ठोंबरे आक्रमक झाल्या. याप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रूपाली ठोंबरे यांनी मतमोजणी थांबवली आहे. ठोंबरे आणि गणेश भोकरे यांच्यात तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांशीही वाद निर्माण झाला आहे. या गोंधळामुळे मतमोजणी केंद्रावर तणावाचे वातावरण असून निवडणूक अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या आरोपानंतर मतमोजणी तातडीने थांबवण्यात आली असून ठोंबरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.