‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’च्या अर्ज प्रक्रियेत बदल; राज्य सरकारचा निर्णय

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा अनेक महिलांना लाभ मिळाला. माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १ हजार ५०० रुपये त्यांच्या खात्यावर जमा करणार आहे. प्राप्त माहितीनुसार योजनेअंतर्गत आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट या दोन टप्प्यांत एक कोटी ५९ लाख लाभार्थ्यांना चार हजार ७८७ कोटींचा लाभ देण्यात आला आहे.
या योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ करण्यात आली होती. या योजनेसाठी ३० सप्टेंबर २०२४पर्यंत अर्ज करता येणार आहे. आता या योजनेबाबत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अर्ज करण्याच्या प्रक्रियेत आता महत्वाचा बदल करण्यात आला आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारने या योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांशिवाय आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक यांसारख्या 11 प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आलं होतं. मात्र योजनेसाठी आता अंगणवाडी सेविकांव्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना दिलेले अर्ज स्वीकारण्याचे अधिकार रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळाने घेतला आहे. लाडकी बहीण योजनेच्या या नवीन नियमानुसार फक्त अंगणवाडी सेविकाच या योजनेच्या अर्जांना मंजुरी देऊ शकणार आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या नावाने ३० अर्ज दाखल केले होते. त्यातील २६ अर्ज मंजूरदेखील झाले होते. त्यामुळेच राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यातील अर्जांना केवळ अंगणवाडी सेविकांकडूनच मंजूरी मिळणार आहे.
हेही वाचा:
‘काँग्रेस’शी न जुळल्याने ‘आप’चे ‘एकला चलो रे’? ; हरियाणात तुटणार युती ? काय झालं नेमकं वाचा





