Pune | पुणे-सोलापूर मार्गावर वाहतुकीत बदल

पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावर मम्मादेवी चौक ते अर्जुन रोड टी जंक्शन दरम्यान एम. पी. पेट्रोल पंपाजवळ पाण्याची पाइपलइन टाकण्यात येणार आहे. हे काम दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा पुणेकडून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर व दुसऱ्या टप्प्यात सोलापूरकडून पुण्याकडे येणाऱ्या रोडवर खोदकाम करण्यात येणार आहे. यामुळे पुणे- सोलापूर रोडवरील वाहतूक वळविण्यात आली आहे.
असे असेल तात्पुरते नियोजन
– सोलापूरकडून स्वारगेटला जाणारी वाहतूक सरळ अर्जुन रोड मम्मादेवी मार्गे स्वारगेटकडे जाईल, यात कोणताही बदल नाही.
– स्वारगेटकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक मम्मादेवी चौकात सरळ जाण्यास बंदी असून, डावीकडे वळून बीशप सर्कल उजवीकडे वळून सोलापूर मार्गावर जाईल. सदर सर्व मार्ग हा “वन-वे’ करण्यात येत आहे.
– सोलापूरकडून येणारी वाहने ही सरळ मम्मादेवी-गोळीबार चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.
– डॉ. कोयाजी रोडने येणारी वाहने हरप्रित मंदिर चौकात उजवीकडे वळून खाणे मारुती चौक, पूलगेट बस डेपोमार्गे कोंढव्याला जातील.
– सोलापूरकडून येणारी वाहने मम्मादेवी चौकात उजवीकडे वळण्यास बंदी असून, ती गोळीबार चौक सरळ व उजवीकडे वळून कॅम्पमार्गे इच्छितस्थळी जातील.




