पुणे : पिढ्यानपिढ्या ग्राहकांचा विश्वास संपादन केलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी चंदुकाका सराफ यांनी अधिकमासाच्या शुभ पर्वानिमित्त खास पारंपरिक चांदीच्या वस्तू आणि आकर्षक दागिन्यांचा विशेष संग्रह ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. या खास कलेक्शनमध्ये चांदीच्या पारंपरिक वस्तू, पूजेसाठी लागणारे साहित्य, पायल, जोडवी तसेच विविध आकर्षक दागिन्यांच्या असंख्य व्हरायटीजचा समावेश करण्यात आला आहे. अधिकमासाच्या या पवित्र आणि मंगलमय पर्वानिमित्त ग्राहकांसाठी अनेक आकर्षक ऑफर्सची घोषणा करण्यात आली आहे. चांदीच्या भांडी व दागिन्यांच्या घडणावळीवर तब्बल २५% पर्यंत सूट देण्यात येत आहे. तसेच जुन्या सोन्याच्या दागिन्यांच्या एक्सचेंजवर प्रति तोळा रु. 3000 पर्यंत विशेष लाभ ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय “जेवढे सोने, तेवढी चांदी मोफत” आणि “जेवढे हिरे, तेवढे सोने मोफत” अशा आकर्षक ऑफर्सदेखील ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अधिकमासाच्या शुभमुहूर्तावर पारंपरिक खरेदीचा आनंद घेण्यासाठी आणि या विशेष ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी आपल्या जवळच्या चंदुकाका सराफ स्टोअरला भेट द्यावी, असे आवाहन चंदुकाका सराफचे चेअरमन श्री. किशोरकुमार शहा व संचालक कु. सम्यक किशोरकुमार शहा यांच्यातर्फे करण्यात आले आहे. नियम व अटी लागू. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक: 1800 267 8555 हेही वाचा : Prasad Lad : मनोज जरांगेंसमोर प्रसाद लाड भावूक! अॅान कॅमेरा चर्चा सुरु असताना नेमकं काय घडलं?