चंदुकाका सराफ: बारामतीपासून सुरू झालेल्या २०० वर्षांच्या विश्वासाचा ‘उत्सव नात्यांचा’
Chandukaka Saraf: सोन्याच्या दागिन्यांवर ६.९९%, हिऱ्यांच्या दागिन्यांवर ०% घडणावळ; २०० बक्षिसे जिंकण्याची संधी

पुणे : १८२७ मध्ये बारामतीतून सुरू झालेला आणि गेल्या दोनशे वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास संपादन केलेला चंदुकाका सराफ यंदाची दिवाळी ‘उत्सव नात्यांचा’ या विशेष संकल्पनेतून साजरी करत आहे.
पिढ्यान्पिढ्या जपलेली परंपरा, ग्राहकांचे प्रेम आणि विश्वास यांचा गौरव करण्यासाठी यंदा ग्राहकांसाठी आकर्षक दागिन्यांचे संग्रह, विशेष ऑफर्स आणि २०० बक्षिसांची पर्वणी आणण्यात आली आहे.
दोनशे वर्षांच्या या प्रवासात चंदुकाका सराफ अनेक कुटुंबांच्या आनंदाच्या क्षणांचा भाग बनला आहे. लग्नसोहळे, सण-समारंभ आणि कौटुंबिक आठवणींशी जोडलेले हे नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न यंदाच्या ‘उत्सव नात्यांचा’ संकल्पनेतून करण्यात आला आहे.
दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी पारंपरिक सोन्याचे, हिऱ्यांचे, ब्रायडल तसेच हलक्या वजनाचे आणि आधुनिक डिझाइन्सचे दागिने उपलब्ध आहेत. यासोबतच सोन्याच्या दागिन्यांवर फक्त ६.९९% घडणावळ आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर ०% घडणावळ अशा आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत.
२०० बक्षिसे जिंकण्याची संधी
यंदाच्या विशेष उपक्रमांतर्गत ग्राहकांना टाटा टियागो कार, ज्युपिटर स्कूटर, बुलेट मोटारसायकल, मोबाईल फोन, गिफ्ट व्हाउचर्ससह एकूण २०० बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
याबाबत बोलताना चंदुकाका सराफचे व्यवस्थापकीय संचालक सम्यक किशोरकुमार शाह म्हणाले, “बारामतीतून सुरू झालेला आमचा प्रवास आज दोनशे वर्षांच्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रवासात ग्राहकांनी दिलेला विश्वास आणि पिढ्यान्पिढ्यांनी जपलेले नाते हीच आमची खरी संपत्ती आहे.
बदलत्या काळानुसार पारंपरिक दागिन्यांसोबतच तरुण पिढीच्या आवडीनुसार आधुनिक आणि हलक्या वजनाचे दागिने उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. यंदाच्या दिवाळीत २०० बक्षिसांच्या माध्यमातून ग्राहकांच्या आनंदात सहभागी होण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
ग्राहकांनी दिवाळीच्या खास ऑफर्स आणि आकर्षक दागिन्यांच्या संग्रहाचा लाभ घेण्यासाठी चंदुकाका सराफच्या जवळच्या दालनाला भेट द्यावी.
संपर्क : १८०० २६७ ८५५५
Website: www.chandukakasaraf.in







