चांद्रयान-2 चे प्रक्षेपण तांत्रिक कारणाने रद्द: शास्त्रज्ञांचा शेवटच्या क्षणी निर्णय

श्रीहरीकोटा : काही तांत्रिक कारणांमुळे इस्रोने चांद्रयान-2 मोहिमेचे प्रक्षेपण रद्द केले आहे. शास्त्रज्ञोनी अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे प्रक्षेपणाला 56 मिनिटं आणि 24 सेकंद राहिले असताना काउंटडाऊन रोखले. पहाटे 2 वाजून 51 मिनिटांची चांद्रयानाचे उड्डाण होणार होते. मात्र क्रायोजिनिक इंजिनमध्ये इंधन भरताना काही तांत्रिक दोष आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने प्रक्षेपण रोखण्यात आल्याचे इस्रोने म्हटले आहे.

GSLV Mk-3 या बाहुबली प्रक्षेपकाच्या साह्याने ‘चांद्रयान 2’ आकाशात झेपावणार होते. त्यासाठी इस्रोची तयारीही पूर्ण झाली होती. मात्र क्रायोजिनिक इंजनच्या यंत्रणेत काही दोष आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला. रॉकेटमध्ये जेवढं इंधन भरण्यात आले होते ते खाली केल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता इस्रोने व्यक्त केली आहे. रॉकेटमध्ये भरलेले सर्व इंधन खाली करण्यात येणार आहे. त्यानंतर रॉकेट पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात येईल. त्याची सखोल तपासणी केल्यानंतरच नवी तारीख जाहीर होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान आकाशात झेपावणार होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.