कोथरूडमधील संस्था संघटनांचा चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा

पुणे – विविध सामाजिक सांस्कृतिक संघटनांनी महायुतीचे कोथरूड विधानसभा मतदार संघातील उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.

पतीत पावन संघटनेने पाटील यांना पाठिंबा दिला आहे. श्रीकांत शिळीमकर, पप्पू टेमघरे, तुकाराम खाडे, संतोष शेंडगे, शरद देशमुख, राजू मोहोळ, सुनील मराठे, ज्ञानेश्‍वर साठे, आण्णा बांगर, सोपान फाले आदींनी संदर्भात निवेदन दिले आहे. सोलापूर जिल्हा मित्रमंडळातर्फे विशाल मारुती गुंड पाटील यांनी पाठिंब्याचे पत्र दिले आहे. जनशक्‍ती विकास संघातर्फे अध्यक्ष मुकेश साबळे यांनी पाटील यांना पाठिंबा व्यक्‍त केला आहे.

एमआयटी शाळा पालक कृती समितीची नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारमार्फत झालेल्या विकास प्रकल्पांबाबत समाधान व्यक्‍त करण्यात आले. तसेच, ही विकास भरारी कायम राखण्यासाठी पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यात आला. समितीच्या वतीने अध्यक्ष संजय मोरे यांनी पाठिब्याचे पत्र दिले आहे.

स्वयंसेवक पोलीस मित्र आणि वाहतूक सल्लागार समिती कोथरूड यांच्या वतीने पाटील यांना पाठिंबा देण्यात आला आहे. संघटनेचे अध्यक्ष संदीप कुंबरे, अध्यक्ष राहुल जाधव, कार्याध्यक्ष संदीप जाधव यांनी तसे निवेदन दिले आहे.

महाराष्ट्र बॅंड कलाकार उत्कर्ष संस्थेने देखील पाठिंबा दिला आहे. बॅंड कलाकारांना पेन्शन वाहनांना परवाने आदी मागण्यांबाबत विचार करण्याचे आश्‍वासन चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. जय भवानी नगर महाराजा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे अध्यक्ष मयूर मारणे यांच्या वतीने पाठिब्याचे पत्र देण्यात आले. करिष्मा गृहरचना संस्थेतर्फे अभय जगदाळे आणि सेक्रेटरी श्रीधर देव, साकार सृष्टी गृहरचना संस्थेतर्फे अध्यक्ष शुभांगी गायकवाड, रेखा भांगे आदींनी पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

विविध घटकांमधून उत्स्फूर्त वाढता पाठिंबा मिळत असल्याबद्दल पाटील यांनी कृतज्ञता व्यक्‍त केली. कोथरूडकरांच्या वाढत्या पाठिब्यामुळे आपण भारावून गेलो असून, त्यांची अपेक्षापूर्ती करण्यासाठी मी सर्वतोपरीने प्रयत्न करीन, असे आश्‍वासन पाटील यांनी दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)