मुंबई: राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर पायरी सोडून टीका केली. याला चोख प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष व आमदार हेमंत टकले यांनी पाटील यांच्यावर खरपूस टीका केली आहे.
खा. शरद पवार यांनी राज्य आणि देश उभारणीत ५० वर्षांहून अधिक काळ मोलाचे योगदान दिले आहे, पक्षात वशिल्याच्या बळावर दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या नेत्याने, देशाच्या उभारणीसाठी हातभार लावलेल्या नेतृत्वाबद्दल संतापजनक व आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास महाराष्ट्र शांत बसणार नाही, असा इशारा टकले यांनी दिलाय.