चंदन मिश्रा हत्याकांड प्रकरण : शूटर तौसिफसह 8 जणांना अटक

Chandan Mishra Murder Case | पाटण्यातील पारस रुग्णालयात झालेल्या खून प्रकरणात बिहार पोलिसांच्या पथकाने कोलकात्यात छापा टाकला आणि मुख्य शूटर तौसिफ खान उर्फ बादशाह, निशू खानसह आठ आरोपींना अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे कोलकाता येथील गेस्ट हाऊसमध्ये छापा टाकताना पोलिस पथकाने एका महिलेलाही ताब्यात घेतले आहे. या कारवाईदरम्यान पोलिस आणि गुन्हेगारांमध्ये गोळीबारही झाला. त्यामध्ये एक आरोपी जखमीही झाला आहे.
चंदन मिश्रावर गोळीबार करणाऱ्यांपैकी एक तौसिफ त्याच्या मित्रांसह कोलकात्यातील आनंदपुरी परिसरातील एका गेस्ट हाऊसमध्ये लपून बसला असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर एसटीएफ आणि कोलकाता पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. यादरम्यान तौसिफ, निशू खान, हर्ष उर्फ हरीश कुमार, भीम कुमार यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत एक महिलाही होती. तिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
निशू खान हा पाटण्याच्या समनपुरा भागातील रहिवासी आहे. चंदन मिश्राच्या हत्येनंतर तो फरार झाला होता. निशूवर गोळीबार करणाऱ्याला त्याच्या घरात आश्रय दिल्याचाही आरोप आहे. पारस रुग्णालयात सहा गुन्हेगार चंदन मिश्राला मारण्यासाठी आले होते. यापैकी पाच हल्लेखोरांनी रुग्णालयाच्या खोलीत घुसून चंदन मिश्रावर ३६ गोळ्या झाडल्या होत्या. Chandan Mishra Murder Case |
या दोघांव्यतिरिक्त सचिन सिंग, हर्ष उर्फ हरीश कुमार, भीम कुमार आणि एक महिला अल्पना दास यांनाही अटक करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी एसटीएफ आणि पाटणा पोलिसांच्या पथकाने कोलकातामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. Chandan Mishra Murder Case |
हेही वाचा :
‘शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…’; जितेंद्र आव्हाडांचा माणिकराव कोकाटेंवर निशाणा


