Champions Trophy : उपांत्य फेरीत भारतासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान, जाणून घ्या कधी व कुठे पाहता येईल हा रंगतदार सामना?

Champions Trophy 2025 | आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या गटफेरीतील अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव करत स्पर्धेतील सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. या सोबतच, भारत गट अ मध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर या गटातून न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे गट ब मधून दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीतील भारताचा सामना कधी व कोणाशी होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया.
Champions Trophy 2025: उपांत्य फेरीत भारताचा सामना कोणत्या संघाशी?
गट अ मध्ये गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवणाऱ्या संघाचा सामना गट ब मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी होणार आहे. म्हणजेच उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. तर गट ब मध्ये गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेला संघ गट ब मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी भिडेल. म्हणजेच दक्षिण आफ्रिकेचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.
Champions Trophy 2025: पहिली उपांत्य फेरी कधी पार पडणार?
उपांत्य फेरीतील पहिला सामना 4 मार्चला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना दुबईतील इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडेल.
Champions Trophy 2025: दुसरा उपांत्य फेरी कधी पार पडणार?
उपांत्य फेरीतील दुसरा सामना 5 मार्चला लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पार पडेल. हा सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघामध्ये खेळला जाणार आहे.
Champions Trophy 2025: कधी व कुठे पाहता येईल उपांत्य फेरीतील सामने?
4 मार्चला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि 5 मार्चला दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघामध्ये उपांत्य फेरीतील सामना पार पडेल. हे दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होतील. हे दोन्ही सामने जिओ हॉटस्टार अॅप व वेबसाइट आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.





