जेजुरी : आज मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा, श्री खंडोबा देवाचा श्री मार्तंड भैरव षडरात्रौत्सव म्हणजेच चंपाषष्ठी उत्सव जेजुरी गडावर साजरा केला जात आहे. मुख्य गाभाऱ्यातील स्वच्छता/पाखळणी उरकल्यानंतर मुख्य उत्सव मूर्ती बालद्वारीमध्ये स्थापना करणे करिता नेण्यात आल्या. पुजारी सेवेकरी वर्गाकडून सालाबाद प्रमाणे घटस्थापना प. पू. आद्य श्री नृसिंह भारती शंकराचार्य करवीर पीठ कोल्हापूर यांचे शुभहस्ते ठीक 12 वाजता करण्यात आली. यावेळी पुजारी सेवेकरी वर्ग, श्रीमार्तंड देवसंस्थान विश्वस्त प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, वेदमूर्ती पुरोहित शशिकांत सेवेकरी काका, मंगेश खाडे गुरुजी यांच्या मंत्रोच्चाराच्या व सनई चौघडा वादनामध्ये विधिवत पूजा अभिषेक उत्सव मूर्ती घटस्थापनेच्या ठिकाणी बसविण्यात आल्या. यावेळी श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, ॲड. विश्वास पानसे तसेच पुजारी सेवेकरी गणेश आगलावे, अविनाश सातभाई, प्रशांत सातभाई, वैभव दीडभाई, चेतन सातभाई, अनिल बारभाई, धनंजय आगलावे व इतर पुजारी सेवेकरी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आल्या.