Chakan News : चाकण परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्रपाळी करून घरी परतत असताना निर्जन रस्त्यावर कुत्र्यांच्या टोळक्याने महिलेव हल्ला केल्याने काही मिनिटांतच तिचा मृत्यू झाला. हा प्रकार चाकण परिसरातील ‘परदेशी कडबा कुटी’ समोरील रस्त्यावर घडला. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात संतापाची लाट उसळली असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मृत महिलेचे नाव शोभा विजय वाघमारे (वय ३३) असे असून त्या कामावरून परतत पहाटेच्या सुमारास पायी घरी जात होत्या. मात्र रस्ता निर्मनुष्य असल्याने पाच ते सहा भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. कुत्र्यांनी त्यांना खाली पाडून शरीरावर चावा घेत लचके तोडले. निर्जन रस्ता आणि पहाटेची वेळ असल्याने त्यांचा आक्रोश कुणालाही ऐकू गेला नाही. हा हल्ला इतका भीषण झाला की त्यांचा जागीच मृत्यू झाला. Dubai Airport Drone Attack: ड्रोन हल्ल्याने दुबई विमानतळ हादरले! घटनेनंतर इंधन टाकीला भीषण आग ;अनेक उड्डाणे रद्द सीसीटीव्ही कॅमेरा तपासल्यानंतर घटना उघकीस दरम्यान, सकाळी परिसरातील नागरिकांना रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसताच खळबळ उडाली. सुरुवातीला हा खुनाचा प्रकार असावा अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर संपूर्ण घटना उघड झाली. फुटेजमध्ये भटक्या कुत्र्यांचा समूह महिलेवर तुटून पडताना स्पष्ट दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. Stray Dog Attack ‘आणखी किती निष्पाप जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार?’ या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी व नियंत्रणासाठी दरवर्षी मोठा खर्च केला जातो, मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर कुत्र्यांचा सुळसुळाट वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “आणखी किती निष्पाप जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार?” असा सवाल स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे. चाकण आणि एमआयडीसी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून कामगार वर्गाला रात्री-अपरात्री कामावरून ये-जा करावी लागते. त्यामुळे रस्त्यावर दबा धरून बसलेल्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने उपाय योजना करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. हेही वाचा: Dubai Airport Drone Attack: ड्रोन हल्ल्याने दुबई विमानतळ हादरले! घटनेनंतर इंधन टाकीला भीषण आग ;अनेक उड्डाणे रद्द