पिंपरी | उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सचिन पवार यांची निवड

तळेगाव दाभाडे,(वार्ताहर) – तळेगाव स्टेशन येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ग्रामस्थांच्या वतीने डॉ. सचिन विष्णू पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर येथे उत्सव समितीची निवडप्रक्रिया करण्यासाठी ग्रामस्थची बैठक झाली.
यावेळी समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष डॉ. सचिन पवार, सेक्रेटरी मयूर राजगुरव, उपाध्यक्ष सागर भालेराव, नितेश नागे, राकेश शिंदे, नचिकेत शिंदे, कार्याध्यक्ष मयूर भोकरे व वैभव विटे, सहसचिव दिनेश निळकंठ, राहुल चाबुकस्वार, सचिन मढावी, विशाल रोहिटे, संतोष जगताप,
खजिनदार अशोक ओसवाल, सहखजिनदार अनिकेत पानकर, तुषार पवार, रोहन जावळेकर, सल्लागार गणेश खांडगे, कृष्णा कारके, दर्शन खांडगे, नंदकुमार शेलार, जयसिंग भालेराव, सुरेश धोत्रे, बाळासाहेब काकडे, नरेश अग्रवाल, रामदास काकडे, जयसिंग परदेशी,
गणेश काकडे, अशोक म्हाळस्कर, संतोष खांडगे, राकेश प्रेमनाथ अग्रवाल, बाळासाहेब बोराडे, केशव कुल, विजय पलंगे, चेतन पवार, सौरभ चिखले यांची निवड करण्यात आली. तसेच यात्रा कमिटीची कार्यकारणी मंडळाची स्थापनाही करण्यात आली.





