मुंबई – ‘गौतमी पाटील’ हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलच चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहेत गौतमी पाटीलने केलेल्या डान्सचे व्हिडीओ आणि याच व्हिडीओमुळे आज गौतमी पाटील सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. डान्स दरम्यान केलेलं अंगविक्षेप यामुळे गौतमीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, नेटकरी देखील तिच्या या व्हिडिओवर जोरदार कमेंटचा वर्षाव करत असतात.
दरम्यान, आपल्या लावणीमुळे धुमाकूळ घालत संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील हिची लोकप्रियता दिवसेंदिवस आणखीच वाढत आहे. नुकतंच पुण्याच्या खेड तालुक्यात गौतमी पाटीलच्या अदाकारीचा थरार रंगला होता. गौतमीच्या अदाकारीवर तरुणाई एकमेकांच्या खांद्यावर बसून थिरकले. मात्र, काहीच वेळात कार्यक्रमात मोठा राडा होऊन एकमेकांना हाणामारी झाल्याचा प्रकार घडला.
दरम्यान, हा सगळा राडा थांबवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली त्यानंतर हा राडा कुठेतरी आटोक्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे.