डोर्लेवाडी – डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील उपसरपंचपदी छबुताई हनुमंत मदने यांची बिनविरोध झाली. सुप्रिया मनोज नाळे या सरपंचपदी प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. आत्तापर्यंत कधीच उपसरपंच पदाची निवडणूक झाली नाही. उपसरपंच पदाची निवड ही बिनविरोध करून गावाने इतर गावापुढे एक आदर्श ठेवला आहे.
सरपंच सुप्रिया नाळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यामध्ये उपसरपंचपदासाठी मदने व सोनाली नवले, सुमित्रा वामन यांनी अर्ज दाखल झाले होते. यामध्ये नवले, सुमित्रा यांनी अर्ज मागे घेतल्याने मदने यांचा एकमेव अर्ज राहिल्याने निरीक्षक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गायकवाड त्यांना बिनविरोध घोषित केले. ग्राम विकास अधिकारी आर. टी. कारंडे यांनी सहकार्य केले. निवडीनंतर उपसरपंच यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत जय हनुमान पॅनलचे प्रमुख अंकुश खोत, बापूराव गवळी, ज्ञानदेव नाळे, भगवान क्षीरसागर, निवृत्ती नेवसे तर रामभाऊ कालगावकर, कार्यकर्ते मनोज नाळे, महादेव नाळे, मिलिंद घोरपडे, कांतीलाल काळकुटे, ज्ञानदेव मदने, पोलीस पाटील नवनाथ मदने, विजय धोत्रे, विठ्ठल नाळे, पांडुरंग नाळे, मनोज काळोखे, भारत घोडे, कल्याण म्हेत्रे, आबा नाळे, माणिक नाळे, दिलीप गाडे, गजाजन नाळे उपस्थित होते.
मला सर्वात कमी वयामध्ये डोर्लेवाडी गावच्या सरपंचपदी जनतेने बहुमताने निवडून दिले आहे. मी डोर्लेवाडी गावातील जनतेला विश्वास देते की माझ्या हातून जनतेची सेवा निश्चितच होईल. गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेल. महिला युवतींना विविध योजनांचा लाभ मिळवून देईन. सर्वांना बरोबर घेऊन विकासकामे मोठ्या प्रमाणात करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सुप्रिया नाळे यांनी सांगितले आहे.