Cesc Fabregas : स्पेनचा स्टार फुटबॉलपटू फॅब्रिगास निवृत्त
Updated On:

लंडन :- स्पेनचा स्टार फुटबॉलपटू सेरेस्क फॅब्रिगास याने जवळपास दोन दशकांच्या कारकिर्दीनंतर फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. 2010 सालच्या विश्वकरंडक विजेत्या स्पेन संघात फेब्रिगासचा समावेश होता.
आता फॅब्रिगास इटलीतील संघ कोमोचे प्रशिक्षकपद भूषवणार आहे. बार्सिलोनाच्या अकादमीचे फुटबॉलचे धडे गिरवल्यानंतर फॅब्रिगास इंग्लंडमधील आर्सेनल क्लबमध्ये दाखल झाला होता. त्याला वयाच्या 16 व्या वर्षीच पदार्पणाची संधी मिळाली होती.
त्याने 2003 साली लीग करंडक स्पर्धेत व्यावसायिक कारकिर्दीतील पहिला सामना खेळला. त्या वेळी आर्सेलनकडून खेळणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला होता.





