Fiscal Deficit Rises : केंद्राची वित्तीय तूट 12.52 लाख कोटींवर; उद्दिष्टाच्या 80 टक्क्यांहून अधिक
Fiscal Deficit Rises : सरकारने आर्थिक शिस्त कायम ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी मार्च महिन्यातील आकडेवारी आखातातील युद्धामुळे काही प्रमाणात नकारात्मक राहण्याची शक्यता आहे.

Fiscal Deficit Rises : फेब्रुवारी अखेरच्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारची वित्तीय तूट या कालावधीत 12.52 लाख कोटी म्हणजे वार्षिक उद्दिष्टाच्या 80.4 टक्क्यांवर गेली आहे. या कालावधीत गेल्या वर्षी वित्तीय तूट 85.8% होती. म्हणजे उरलेल्या कालावधीत ही तूट उद्दिष्टाच्या जवळपास राहण्याची शक्यता जास्त आहे. यावर्षी केंद्र सरकारने वित्तीय तूट उद्दिष्ट राष्ट्रीय उत्पन्नाच्या 4.4% म्हणजे 15.58 लाख कोटी रुपये इतकी ठेवले आहे.
गेल्या वर्षापेक्षा ही तूट काही प्रमाणात कमी आहे. तरीही उद्दिष्ट साध्य होणार असल्याचे दिसून येते. केंद्र सरकारकडे या कालावधीत आलेली एकूण रक्कम 27.91 लाख कोटी रुपयांची म्हणजे उद्दिष्टाच्या 82 टक्के इतकी आहे.
यामध्ये करातून 21.45 लाख कोटी रुपये तर इतर स्त्रोतांतून 5.8 लाख कोटी रुपये आले. या कालावधीत केंद्र सरकारचा खर्च 40.44 लाख कोटी रुपये म्हणजे एकूण उद्दिष्टाच्या 81.5% आहे. ही सर्व आकडेवारी अर्थसंकल्पात ठरविलेल्या उद्दिष्टाची सुसंगत आहे. सरकारने आर्थिक शिस्त कायम ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी मार्च महिन्यातील आकडेवारी आखातातील युद्धामुळे काही प्रमाणात नकारात्मक राहण्याची शक्यता आहे. मात्र तूट निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकारने गॅस आणि डिझेलच्या दरात प्रत्यक्ष- प्रत्यक्षरीत्या वाढ केली आहे.





