केंद्राची आयपीएलला तत्त्वतः मान्यता
Updated On:

मुंबई – आयपीएल स्पर्धा अमिरातीत आयोजित करण्यासाठी भारत सरकारने तत्त्वतः मान्यता दिल्याचा दावा बीसीसीआयने केला आहे. आयपीएल समितीकडून स्पर्धेत सहभागी होत असलेल्या सर्व संघांना याची कल्पना दिली असून या संघांनी आता आपल्या खेळाडूंना तसेच संबंधितांना विलगीकरणात पाठविण्याची तयारी सुरू केली आहे.
या स्पर्धेसाठी अमिरातीला रवाना होण्यापूर्वी 14 दिवसांसाठी या सर्वांना विलगीकरणातच राहावे लागणार असून शनिवारी सर्व खेळाडू समितीने सांगितलेल्या केंद्रातील विलगीकरणात दाखल होतील. सर्वांची करोना चाचणी होणार असून त्याचा अहवाल आल्यावरच पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.





