अकोला – आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या समाप्ती पूर्वीचमध्य रेल्वेने ३०० कोटी रुपये भंगार विक्रीचेलक्ष्य पार केले. हा टप्पा गाठणारी मध्य रेल्वे पहिली रेल्वे ठरली आहे. आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास अजून अडीच महिने शिल्लक असताना मध्य रेल्वेने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी रेल्वे बोर्डाचे भंगार विक्रीचे लक्ष्यपार करणारी पहिली क्षेत्रीय रेल्वे होण्याचाटप्पा गाठला आहे.
मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी३०० कोटींचे भंगार विक्रीचे उद्दिष्ट ओलांडून ३००.४३ कोटी मिळवले आहेत. एप्रिल तेडिसेंबर २०२३ या कालाव धीतील विक्रीच्या उद्दिष्टापेक्षा ३२.२३ टक्के वाढ झाली आहे जी सर्व क्षेत्रीय रेल्वेमध्ये सर्वाधिक आहे. मध्य रेल्वेने जुने इंजिन्स, अतिरिक्त डिझेल इंजिन, वापरात नसलेले जुने रेल्वे रुळ व जुने आणि अपघाती इंजिन, डब्बे यासह विविध प्रकारचे भंगार ओळखून त्यांची विल्हेवाट लावण्ासाठी पावले उचलली आहेत. यामध्येरेल्वेचे एकूण २२,३४३ मेट्रिक टन, २३ इंजिन, २५२ डब्बे आणि १४४ मालवाहू वॅगनआदींचा समावेश आहे.
भंगार विक्रीतून मिळालेले उत्पन्न असे…
भुसावळ विभाग ५९.१४ कोटी, माटुंगा डेपो ४७.४० कोटी, मुंबई विभागाने ४२.११ कोटी, पुणेविभाग ३२.५१ कोटी, भुसावळ इलेक्ट्रिक लोको शेड डेपो २७.२३ कोटी, सोलापूर विभाग२६.७३ कोटी, नागपूर विभाग २४.९२ कोटी आणि मध्य रेल्वेवर इतर ठिकाणी एकत्रितपणे४०.३९ कोटींची भंगार विक्री झाली आहे.