Raju Shetty : केंद्र सरकारने मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उसाच्या एफआरपी मध्ये प्रति टन १०० रुपयांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, २०२६-२७ हंगामासाठी उसाचा दर आता ३,६५० रुपये प्रति टन करण्यात आला आहे. हे नवे दर १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या साखर हंगामासाठी लागू होणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील सुमारे ५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे. तसेच साखर उद्योगाशी संबंधित सुमारे ५ लाख कामगारांनाही याचा अप्रत्यक्ष फायदा मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. Tamil Nadu Election Result: मोठी बातमी! तामिळनाडूमध्ये AIADMK मध्ये फूट पडणार ; ३० आमदार फुटणार? केंद्र सरकारने २०२६-२७ साठी उसाचा उत्पादन खर्च प्रति टन १,८२० रुपये गृहीत धरला आहे. या तुलनेत ३,६५० रुपये एफआरपी हा खर्चाच्या १००.५ टक्क्यांनी अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच एफआरपीमध्ये करण्यात आलेली वाढ २.८१ टक्के असल्याचेही सरकारने नमूद केले आहे. Raju Shetty नवीन एफआरपी दर १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी लागू राहणार आहे. यापेक्षा जास्त उतारा असल्यास प्रत्येक टक्क्याला प्रति टन ३५६ रुपये अतिरिक्त रक्कम देण्यात येईल. मात्र, साखर उतारा ९.५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास साखर कारखान्यांना प्रति टन किमान ३,३८३ रुपये देणे बंधनकारक राहणार आहे. राजू शेट्टींची नाराजी दरम्यान, काही शेतकरी संघटनांनी एफआरपी वाढ अपुरी असल्याचे म्हटले आहे. माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील प्रति टन किमान ३०० रुपयांची वाढ अपेक्षित होती. एफआरपीला केवळ १०० रुपये वाढवून देणे हा निर्लज्जपणाचा कळस आहे. सरकारने गृहीत धरलेला उत्पादन खर्च १८२० रुपये अवास्तव असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. तसेच खतांचे वाढते दर, मजुरी आणि डिझेलच्या किमतीमुळे प्रत्यक्ष खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याचेही त्यांनी नमूद केले. Raju Shetty हेही वाचा : Palash Muchhal: २५ लाखांच्या फसवणुकीचा आरोप! पलाश मुच्छल अडचणीत; जातीय टिप्पणी प्रकरणात सांगलीत गुन्हा दाखल