शिरूर -करोनाच्या काळात उपचार घेतलेल्या रुग्णांना त्यांचा झालेला खर्च परत मिळावा व कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना घरटी दहा हजार रुपये केंद्र सरकारने मदत द्यावी, या मागणीसाठी शिरूर तहसील कार्यालय येथे शिरूर तालुका रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
रूग्ण हक्क परिषदेचे तालुकाध्यक्ष सविता बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार श्रीशैल् वट्टे यांना निवेदन देण्यात आले.