सणांमध्ये राजकीय नेत्यांची मांदियाळी

सध्या हिंदु, जैन आणि मुस्लीम समाजाचे सण सुरू असून, अनेक सणांमधे राजकीय पुढारींच्या हजेरीमुळे विधानसभेचे पडघम वाजण्यास सुरुवात होत असल्याचे संकेत जनतेला मिळत आहेत. आगामी काही दिवसांतच विधानसभा निवडणूक जाहीर होईल, याची तयारी मात्र उमेदवारी मिळणार असल्याची खात्री बाळगणारा प्रत्येक पुढारी तयारीला लागला असल्याचे चित्र तालुक्‍यात दिसत आहे.

शिवसेनेची स्थिती बिकट असतानाचे बोलले जातेय येथेही विद्यमानांचा सेनाप्रवेश शिवसेनेतील इच्छुकांना बोचणारा असला तरी तालुक्‍यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस याला अपवाद नाही. राज्यात होणारे पक्षांतराचे पडसाद तालुक्‍यात देखील उमटू शकतील का, याबाबत प्रश्‍नचिन्हच आहे. मुळचे जुन्नरच्या येणेरे येथील नामदार छगन भुजबळ यांची ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून आपली छाप असल्याने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा माध्यमांमध्ये “हायरल’ होत आहेत, तसतसे तालुक्‍याच्या राजकीय समीकरणात बदल घडत आहेत. आदिवासी चेहरा म्हणून ज्यांची स्वतंत्र ओळख आहे असे नामदार मधुकर पिचड यांच्या पक्षांतरानंतर झालेले तालुक्‍यातील आदिवासी भागातील स्थानिक पुढाऱ्यांचे पक्षांतराचे परिणाम देखील आगामी निवडणुकीत पाहायला मिळणार आहेत हे नक्की.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकप्रीय खासदार शिवाजी आढळरावांचा रोखलेला चौकार जुन्नरच्या राजकारणात तोडीस तोड ठरणार आहे. या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस पक्षातील इच्छुकांना निवडणूक सोपी जाईल, असा आत्मविश्‍वास वाटत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)