पुणे जिल्हा | भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

विंझर, (वार्ताहर) – भारतीय बौद्ध महासभा वेल्हे (राजगड) तालुका शाखेच्या वतीने विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवर भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा संरक्षण सचिव संदीप कांबळे, वेल्हे तालुका अध्यक्ष अशोक जगताप,
वेल्हे तालुका सरचिटणीस रविराज गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष गणपत (आण्णा) गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली.
त्यानंतर उपस्थितांसमवेत सुक्त पठणाचा कार्यक्रम घेऊन उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून इ.स.पू. च्या तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात “अशोक विजयादशमी” म्हणून साजरा केला जातो.
अशोकाने केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवले होते. म्हणून १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरमध्ये आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारून धर्मांतर केले.
आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून भारतातून लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले. अशी वक्त्यांनी माहिती दिली. याप्रसंगी आरपीआय वेल्हे तालुका अध्यक्ष कुंदन गंगावणे, विश्वा फाउंडेशन संस्थापक संजय गायकवाड, प्रदीप कांबळे, दिनेश गायकवाड,
संतोष गायकवाड, मनोज कांबळे, अविनाश कांबळे, विनोद गायकवाड, राहुल रणखांबे, आल्हाट, कांबळे, सदानंद गायकवाड, उल्हास गायकवाड, विलास गायकवाड तसेच वेल्हे तालुक्यामधील सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

