Chief of Defense Staff । निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख

Chief of Defense Staff : निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चौहान हे देशाचे दुसरे संरक्षण दल प्रमुख बनले आहेत. चौहान यांनी ४० वर्ष लष्करात सेवा दिलेली आहे. यादरम्यान त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळलेली आहे. पहिले संरक्षण दल प्रमुख ( Chief of Defense staff ) बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर ९ महिन्यांनी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
देशाचे पहिले संरक्षण दल ( Chief of Defense staff ) प्रमुख होण्याचा मान बिपीन रावत यांना मिळाला होता. हे पद तीनही दलांचा समन्वय साधण्यासाठी निर्माण करण्यात आलेले आहे. ३० डिसेंबर २०१९ रोजी रावत यांची या महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र विमान अपघातात देशाचे माजी संरक्षण दल प्रमुख ( Chief of Defense staff ) बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी व इतर ११ जणांना जीव गमवावा लागला. तेव्हापासून आजपर्यंत देशाचे संरक्षण दल प्रमुख हे पद खाली होते.
लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांचा जन्म 18 मे 1961 रोजी झाला. 1981 मध्ये त्यांनी भारतीय लष्कराच्या 11 गोरखा रायफल्सची जबादारी सांभाळली आहे. त्यांचे शिक्षण राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला आणि इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून येथून झालेले आहे. ( CDS: Retired Lt. Gen. Anil Chauhan appointed new Chief of Defense staff CDS )
मेजर जनरलच्या पदावर असताना त्यांनी उत्तर कमांडमधील महत्त्वाच्या बारामुल्ला सेक्टरमध्ये इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्व केलेले आहे. सप्टेंबर 2019 पासून ते पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ बनले आणि मे 2021 मध्ये सैन्यातून निवृत्ती घेईपर्यंत हे पद सांभाळले होते.




