“सर्व पोलीस चौक्यांमध्ये CCTV बसविले जाणार” ‘त्या’ घटनेनंतर पुणे पोलिसांचा निर्णय

Updated On:

पुणे – सदाशिव पेठेत मंगळवारी सकाळी एकतर्फी प्रेमातून एका तरूणाने तरूणीवर कोयत्याने हल्ला केला. दोन तरूणांनी दाखविलेल्या धाडसामुळे तरूणी बचावली. मात्र, या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. दिवसभर राज्यभरातून या घटनेवर संतप्त प्रतिक्रया उमटल्या.

तरूणांनी हल्लेखोराला पकडून पेरूगेट पोलीस चौकीत आणल्यानंतर तेथे पोलीस उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे दोघा कर्मचार्‍यांना तेथे ड्यूटी देण्यात आली असताना देखील ते चौकीत उपस्थित नव्हते. तसेच, घटनास्थळी पोलिसांना पोहचण्यास उशीर झाल्याने पोलिसांचे पेट्रोलिंग, बीट मार्शल तसेच दामिनी पथकांवर टिका झाली. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून शहरात पोलीस गस्त वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत.

शहरात सध्या ११० पोलीस चौक्या आहेत. यातील काही चौक्या या अनेक कालावधीपासून बंद आहेत. चौक्या बंद राहण्यामागे अपुरे मनुष्यबळ हे देखील एक कारण आहे. मात्र, आता पोलीस आयुक्तांकडून पोलीस चौक्या पुनर्जिवीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून सर्व पोलीस चौक्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. जेणेकरून चौक्यांमध्ये पोलिसांची उपस्थिती तसेच तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीची माहिती देखील उपलब्ध राहील.

आणखी संबंधित बातम्या

Pune Crime: 'राज पटेल' निघाला 'शहजाद'! पुण्यात बोगस डॉक्टरचा भयंकर कारनामा उघड...राजस्थानातील तरुण ताब्यात

2026-10-06 06:15:34

Pune Crime: 'राज पटेल' निघाला 'शहजाद'! पुण्यात बोगस डॉक्टरचा भयंकर कारनामा उघड...राजस्थानातील तरुण ताब्यात

Top 10 News : विधानपरिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर ते ठाकरे बंधूंचा सरकारवर घणाघात..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

2026-10-04 18:56:41

Top 10 News : विधानपरिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर ते ठाकरे बंधूंचा सरकारवर घणाघात..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Social Media Rumors: पुण्यात २२ दिवसांत १२३ मुली बेपत्ता? 'त्या' व्हायरल क्लिपचे सत्य अखेर आले समोर...जाणून घ्या

2026-10-03 06:45:01

Social Media Rumors: पुण्यात २२ दिवसांत १२३ मुली बेपत्ता? 'त्या' व्हायरल क्लिपचे सत्य अखेर आले समोर...जाणून घ्या

Social Media Rumors: '१२३ महिलांचे दिवसाढवळ्या अपहरण?' पुणे-पिंपरीतील 'त्या' भितीदायक मेसेजमागील धक्कादायक सत्य बाहेर

2026-10-03 01:30:41

Social Media Rumors: '१२३ महिलांचे दिवसाढवळ्या अपहरण?' पुणे-पिंपरीतील 'त्या' भितीदायक मेसेजमागील धक्कादायक सत्य बाहेर

Wagholi Crime: 'आम्ही चौघे भाई आहोत!' वाघोलीत घरासमोर धारदार हत्यारे फिरवून दहशत; चौघांवर गुन्हा

2026-10-01 03:45:44

Wagholi Crime: 'आम्ही चौघे भाई आहोत!' वाघोलीत घरासमोर धारदार हत्यारे फिरवून दहशत; चौघांवर गुन्हा