कृष्णापट्टणम पोर्ट कंपनी लिमिटेडच्या अधिग्रहणाला “सीसीआय’ची मंजुरी
Updated On:

नवी दिल्ली – भारतीय प्रतिस्पर्धा आयोग-सीसीआयने कृष्णापट्टणम पोर्ट कंपनी लिमिटेडच्या अधिग्रहणाला मान्यता दिली आहे. अदानी पोर्टस् व स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडद्वारा हे अधिग्रहण होणार आहे.
प्रस्तावित अधिग्रहणामुळे अदानी पोर्टस् आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कडून कृष्णापट्टनम पोर्ट कंपनी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय नियंत्रणासह इक्विटी शेअरहोल्डिंगचे अधिग्रहण करण्याचा मार्ग मोकळा होईल.
अदानी पोर्टस् एक ग्राहकाभिमुख एकात्मिक बंदर पायाभूत सुविधा सेवा पुरविणारी कंपनी आहे. जी सध्या गुजरात, गोवा, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू व ओडिशा या सहा समुद्री राज्यांमधील दहा घरगुती बंदरांमध्ये कार्यरत आहे. आंध्र प्रदेशातील कृष्णापट्टणम येथील केपीसीएल कंपनी खोल पाण्यातील बंदर विकासक व संचालक म्हणून कार्यरत आहे.





