सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर

पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमधून तसेच डिजिलॉकरमधूनही आपली गुणपत्रिका पाहता येणार आहे.

येथे पाहता येणार निकाल
www.results.nic.in, www.cbseresults.nic.in, www.cbse.nic.in

दरम्यान, करोना पार्श्‍वभूमीवर काही परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. उर्वरित पेपर जुलै महिन्यात घेण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र, विद्यार्थी आणि पालकांकडून चिंता व्यक्‍त करण्यात आली होती. त्यामुळे उर्वरित पेपर रद्द करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.