Pune District | सीबीएसई परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध
Updated On:

पुणे, – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बोर्ड परीक्षा २०२५ ची डेटशीट (वेळापत्रक) प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होतील. वेळापत्रक पीडीएफ डॉक्युमेंटच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
इयत्ता १०, १२ ची परीक्षा देणारे उमेदवार cbse.gov.in वरून वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा १५ फेब्रुवारीला इंग्रजीच्या पेपरने सुरू होईल, तर १२ वीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीला शारीरिक शिक्षणच्या पेपरने सुरू होतील.
परीक्षेच्या विषयानुसार, परीक्षा अनुक्रमे सकाळी १०.३० ते १२.३० आणि दुपारी १.३० या शिफ्टमध्ये घेतल्या जातील. दोन विषयांमध्ये पुरेसे अंतर देण्यात आले आहे.
टॅग्स:





