CBSE : मोठी बातमी ! सीबीएसई मंडळाचे अध्यक्ष आणि सचिवांची तडकाफडकी बदली; ऑन-स्क्रीन मार्किंग प्रकरण काय आहे?
CBSE : सीबीएईच्या ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीवरून निर्माण झालेल्या वादानंतर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. मंडळाचे अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशू गुप्ता यांची बदली करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

CBSE : सीबीएईच्या ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीवरून निर्माण झालेल्या वादानंतर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. मंडळाचे अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशू गुप्ता यांची बदली करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशनच्या अध्यक्षा एस. राधा चौहान या समितीच्या प्रमुख असतील. त्या या प्रकरणाची सखोल चौकशी करून सरकारला अहवाल सादर करणार आहेत.
माध्यमांतील वृत्तांनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तसेच आणखी काही अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
CBSEने यावर्षी बारावीच्या पुनर्मूल्यांकनासाठी पूर्णपणे डिजिटल ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणाली सुरू केली होती. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या चुकीच्या स्कॅन प्रती मिळाल्याच्या, काही पाने गायब असल्याच्या तसेच इतर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका मिळाल्याच्या तक्रारी केल्या होत्या.
याशिवाय, उत्तरपत्रिकांच्या प्रतींसाठी अर्ज करताना ऑनलाइन शुल्क भरण्यातही अनेक विद्यार्थ्यांना अडचणी आल्या. त्यामुळे या प्रणालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आता चौकशी समिती नेमण्यात आली असून, तिच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.
ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) म्हणजे काय?
ऑन-स्क्रीन मार्किंग म्हणजे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका स्कॅन करून त्या संगणकाच्या स्क्रीनवर तपासण्याची पद्धत. पूर्वी परीक्षकांना उत्तरपत्रिकांचे मूळ कागद पाठवले जात होते. ते त्या हातात घेऊन तपासत असत. मात्र OSM प्रणालीमध्ये उत्तरपत्रिका स्कॅन केल्या जातात आणि परीक्षक त्या ऑनलाइन स्क्रीनवर पाहून गुण देतात.
अशी असते प्रक्रिया –
विद्यार्थी परीक्षेत पेपर लिहितात. त्या उत्तरपत्रिका स्कॅन करून डिजिटल स्वरूपात रूपांतरित केली जाते. नंतर परीक्षक संगणक किंवा लॅपटॉपवर ती उत्तरपत्रिका पाहतात. प्रत्येक प्रश्नाला ऑनलाइन गुण दिले जातात. गुण थेट प्रणालीमध्ये नोंदवले जातात.
याचे फायदे –
उत्तरपत्रिका हरवण्याचा धोका कमी होतो. तपासणीची प्रक्रिया वेगवान होते. गुणांची नोंद अधिक अचूकपणे करता येते. देशभरातील परीक्षक ऑनलाइन तपासणी करू शकतात.
सध्या वाद का झाला?
CBSEच्या OSM प्रणालीमध्ये काही विद्यार्थ्यांना चुकीच्या स्कॅन प्रती मिळाल्या, काही पृष्ठे गायब असल्याच्या तक्रारी आल्या आणि काहींना दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाही मिळाल्या. त्यामुळे या प्रणालीच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.





