मोठं ‘रॅकेट’ येणार उघडकीस; ‘कोळसा स्मगलिंग’ प्रकरणात तीन राज्यात CBIचे छापे
s in three states in
Updated On:

नवी दिल्ली – कोळसा स्मगलिंग प्रकरणात सीबीआयने शनिवारी तीन राज्यांत तब्बल 40 ठिकाणांवर छापे घातले आहेत. कोळसा चोरी करून त्याची निर्यात करणाऱ्यांची संशयितांची या छाप्यात झाडाझडती घेण्यात आली आहे.
यातील बहुतांशी छापे पश्चिम बंगाल राज्यांत घालण्यात आले आहेत. या छाप्यांतून कोळशाच्या स्मगलिंगचे मोठे रॅकेट उघडकीला येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्या ठिकाणी हे छापे घालण्यात आले त्यात काही व्यापाऱ्यांचाही समावेश आहे.
त्यातून मोठा गैरव्यवहार उघडकीला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तीन राज्यांमध्ये हे छापे टाकण्यात आले असल्याचे सांगितले जात असले तरी पश्चिम बंगाल खेरीज अन्य कोणत्या दोन राज्यांमध्ये हे छापे टाकण्यात आले त्याची माहिती तातडीने उपलब्ध होऊ शकलेली नाही.





