FAA Recruitment Scam : जम्मू-काश्मिरात CBI चे 37 ठिकाणी छापे

नवी दिल्ली – सीबीआयने जम्मू-काश्मीरच्या वित्त विभागातील लेखा सहाय्यकांच्या भरती परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारांच्या संबंधात राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये 37 ठिकाणी आज छापे घातले. सीबीआयच्या गुप्तचरांनी शुक्रवारी सकाळी जम्मूमधील 30 ठिकाणी शोध मोहीम राबवली.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जम्मू आणि काश्मीर सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड द्वारे घेतलेल्या परीक्षेतील कथित अनियमिततेबद्दल 20 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हा गुन्हा नोंदवण्यात आलेल्यांमध्ये बोर्डाच्या माजी सदस्या नीलम खजुरिया, सेक्शन ऑफिसर अंजू रैना आणि बीएसएफ फ्रंटियर हेडक्वार्टरचे मेडिकल ऑफिसर कर्नेल सिंग आणि पोलिस उपनिरीक्षक यांचाही समावेश आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/the-governor-appreciated-the-maharashtra-ncc-contingent-for-winning-several-individual-and-team-trophies-and-felicitated-the-cadets/
या भरतीसाठी बोर्डाने 6 मार्च 2022 रोजी परीक्षा घेतली होती आणि त्याच वर्षी 21 एप्रिल रोजी निकाल प्रकाशित करण्यात आला होता.





