वाधवान पिता-पुत्राविरोधात येस बॅंक कर्ज घोटाळ्याबद्दल गुन्हा

नवी दिल्ली – एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक असणाऱ्या राकेश आणि सारंग वाधवान या पिता-पुत्राविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला. येस बॅंकेतील 200 कोटी रूपयांच्या बॅंक घोटाळ्याबद्दल ते पाऊल उचलण्यात आले. त्यानंतर सीबीआयने मुंबईत 10 ठिकाणी छापे टाकले.

येस बॅंकेकडून मॅक स्टार या कंपनीला कर्ज देण्यात आले. त्या कंपनीची एचडीआयएल भागधारक आहे. कर्ज मिळाल्यानंतर काही रक्कम एचडीआयएलच्या बॅंक खात्यांत वर्ग करण्यात आली. त्यामुळे सीबीआयने वाधवान पिता-पुत्राबरोबरच एचडीआयएलच्या इतर संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला.

त्यानंतर सीबीआयने मुंबईत छापासत्र हाती घेतले. त्याअंतर्गत वाधवान यांच्या घराची झडती घेण्यात आली. त्याशिवाय, एचडीआयएलच्या दोन कार्यालयांवर आणि इतर सात ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्या कारवाईचा तपशील तातडीने मिळू शकला नाही. दरम्यान, सारंग वाधवान यांनी काही गैर केल्याचे नाकारले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.