आयपीएल स्पर्धेत खबरदारी आवश्यक – नेस वाडिया
Updated On:

मुंबई – बीसीसीआय व आयपीएल समितीने करोनाबाबत सुरक्षेचे सर्व उपाय सज्ज राखायला हवेत. प्रत्यक्ष स्पर्धेदरम्यान एक खेळाडू जरी करोनाबाधित असल्याचे आढळले तर संपूर्ण स्पर्धाच रद्द करावी लागू शकते, असा इशारा किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे सह-मालक नेस वाडिया यांनी दिला आहे.
या स्पर्धेसाठी सर्व संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफ तसेच संबंधित सर्वच व्यक्तींना अमिरातीत जाण्यापूर्वी 14 दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. तसेच अमिरातीत दाखल झाल्यावर त्यांना तीन दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यामुळे करोनाबाबत खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.





