राष्ट्रवादीच्या माजी शहराध्यक्षाचा मुलगा आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

Karan Mankar : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्यांवर बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आता त्यांचा मुलगा करण मानकर आणि त्यांचे सासरे सुखेन शाह यांच्यावर देखील बनावट दस्त तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड हाऊस फाऊंडेशनाचा शंतनू कुकडे यांच्यावर अल्पवयीन मुलीच्या अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास सुरू असताना कुकडे आणि रोनक जैन यांच्या बँक खात्यावरून लाखोंचा व्यवहार झाल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले. त्यासंदर्भात पोलिसांनी चौकशी केली असता दीपक मानकर, करण मानकर आणि सुखेन सुरेशचंद्र शहा यांच्या बँक खात्यावर लाखो रुपयांचा व्यवहार झाला असल्याचे समोर आले.
या प्रकरणी करण मानकर यांनी पोलिसांनी सांगितले की डोणजे येथे दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी शंतनू कुकडे याने पाच कोटी रुपये कर्ज स्वरुपात देणार होता. हे कर्ज पुढील ४० वर्षांसाठी होते. त्यासंदर्भात ५०० रुपयांच्या स्टँपवर करारनामाम देखील झाला होता. अशी माहिती त्यांनी पोलिसांनी दिली होती. मात्र, पोलिसांनी चौकशी केली असता हे दस्त बनावट तयार केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी करण मानकर याच्यासह इतरांवर गुन्हा नोंदवला आहे.





