सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरने फेर मतदान घेण्याला प्रशासनाने विरोध केला होता. त्यांनी मतदान प्रक्रिया स्थगित केली होती. यानंतर आता मारकडवाडी येथील ग्रामस्थांच्या विरोधात अखेर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीएनएस 353(1) (ब), 189 (1), (2), 190, 223 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले आहे. माळशिरसच्या नातेपुते पोलीस ठाण्यात सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केले आहे.ईव्हीएम मशीन संदर्भात अफवा पसरवून फेर मतदानाची तरतूद नसताना प्रशासनाचे आदेश डावलल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल झालेल्यांची नावे 1) संजय हरिभाऊ वाघमोडे 2) राजेद्र अंकुश मारकड 3) वैभव वाघमोडे 4) विजय वाघमोडे 5) विलास आद्रट 6) रणजित जिजाबा मारकड 7) लक्ष्मण सिताराम मारकड (8) सर्जेराव बाबुराव लोखंडे (9) संदिपान आण्णा मारकड 10) अमित वाघमोडे 11) दत्तु राघु दडस 12) आबा नाना मारकड 13) बबन दादा वाघमोडे 14) मारुती शंकर रणदिवे 15) नानासाहेब मारकड 16) संजय नरळे 17) शरद कोडलकर. सर्व रा. मारकडवाडी. 18) इतर 100 ते 200 लोक काय आहे नेमके प्रकरण? मारकडवाडी गावात उत्तम जानकरांना कमी मतं मिळाल्याने बॅलेटवर मतदानाची मागणी झाली. मारकडवाडीचं एकूण मतदान आहे २ हजार ४७६. विधानसभा निवडणुकीत मतदान झालं १ हजार ९०५ यापैकी १००३ मतं पडली राम सातपुतेंना तर ८४३ उत्तम जानकरांना. त्यामुळे गावातील लोकांनी बॅलेटवर मतदानाची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने याला नकार दिला होता.