राजस्थानात RSSच्या नेत्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा

जयपुर – राजस्थानात तेथील सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरीष्ठ नेत्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवला आहे. त्याचा घरोघरी कचरा वेचण्याच्या कामातील कंत्राटदाराकडून 20 कोटी रूपयांचे कमिशन घेतल्याचा प्रकरणात सहभागा आहे असा आरोप आहे. निंबाराम असे या नेत्याचे नाव आहे.
या प्रकरणात जयपुर महापालिकेचे महापौर सौम्या गुर्जर यांचे पती राजाराम गुर्जर आणि बीव्हीजी कंपनीच्या प्रतिनिधीला अटक करण्यात आली आहे. राजाराम गुर्जर आणि बीव्हीजी कंपनीचा प्रतिनिधी यांच्या 20 कोटी रूपयांच्या कमिशनच्या संबंधातील दूरध्वनीवरील बोलणे सोशल मिडीयात व्हायरल झाले आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
या व्हायरल व्हिडीओ मध्ये ज्यात कमिशनच्या बाबींची चर्चा झाली त्यात संघाचे प्रचारक निंबाराम हेही सहभागी झाल्याचे दिसत असल्याने त्यांच्या विरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात भाजपच्या एका शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन ही कारवाई बदनामी करण्याच्या उद्देशाने झाली असल्याची तक्रार त्यांच्याकडे दिली आहे.





