इंग्लंड संघाला करोनाचा फटका, ॲशेस मालिकेवरही संकट
Updated On:

सिडनी – इंग्लंड संघाचे प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यामुळे थेट ॲशेस कसोटी मालिकेवर सावट निर्माण झाले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यात पराभवाचा सामना केल्यावर तसेच मालिका गमावल्यानंतर करोनाचा फटका बसला आहे. आता पुढील काही दिवस विश्रांती असून चौथ्या कसोटीपूर्वी सिल्वरवूड विलगीकरणातून बाहेर येणार नसल्याने त्यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
सिल्वरवूड यांच्यासह इंग्लंड संघाशी संबंधित सात जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यात सपोर्ट स्टाफमधील तीन सदस्य आणि चार कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. सिल्वरवूड यांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत मेलबर्नमध्ये 10 दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.





