पारगाव शिंगवे – जीवघेण्या करोना विषाणूपासून जनतेने काळजी घेणे आवश्यक आहे, असे मत सरपंच बबनराव ढोबळे यांनी व्यक्त केले. पारगाव (ता. आंबेगाव) येथील आरोग्य उपकेंद्राच्या वतीने श्री संगमेश्वर माध्यमिक आणि कै. बाबुराव गेनुजी ढोबळे उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान विद्यालय येथे करोनाविषयी आरोग्य शिक्षणामार्फत माहिती देण्यात आली यावेळी ते बोलत होते. आरोग्य सहाय्यक अनिल तोडकरी यांनी करोना विषाणू या रोगाविषयावर आरोग्य शिक्षणामार्फत घेण्यात येणाऱ्या काळजीविषयी माहिती दिली, तसेच जनजागृती प्रचारात हात धुण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविले. यावेळी ग्रामविकास अधिकारी कचरदास भोजणे, प्राचार्य प्रकाश सुतार, पर्यवेक्षक कैलास येलभर, आरोग्य सेविका सारिका पडवळ, विद्यालयातील मुले, मुली व शिक्षक उपस्थित होते.