निरा देवघर धरणात कार बुडाली ; तिघेजण बुडाल्याची शक्यता, एकाला वाचवण्यात यश
Updated On:

भोर : भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात शिरगाव गावच्या हद्दीत एक कार निरा देवघर धरणाच्या पाण्यात पडल्याची घटना घडली आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
कारमध्ये तीन पुरुष आणि एक महिला असे चौघेजण होते. त्यापैकी एक जण बचावला असून तिघेजण बुडाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघात ग्रस्त हे पुण्यातील रावेर येथील असल्याचे समजते.
शासनाचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, भोरमधील सह्याद्री रेस्क्यू टीमचे सदस्य आणि भोईराज मंडळाचे सदस्य हे पोलिसांसमवेत घटनास्थळी रवाना झालेले आहेत.





