आळेफाट्याजवळ शस्त्रसाठा हस्तगत

एकास अटक ः ऐन निवडणुकीतील घटनेने खळबळ

शिवनेरी  –
आळेफाटा येथून जवळच असलेल्या पिंपळवंडी शिवारातील अभंगवस्तीत मंगळवारी (दि. 2) सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात स्फोटक सदृश पावडर, काही घातक हत्यारांसह एका आरोपीस अटक केली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात हा शस्त्रसाठा सापडल्याने तालुक्‍यात खळबळ उडाली.
राजाराम किसन अभंग (वय 60, रा. अभंगवस्ती, पिंपळवडी, ता. जुन्नर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर धनवट यांनी दिलेल्या माहिती नुसार लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यातील गोपनीय माहिती काढणेकामी नेमलेल्या सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, दहशतवाद विरोधी पथकाचे राजू पवार व किरण कुसाळकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सन 2003 मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या राजाराम अभंग याच्याकडे स्फोटक पदार्थ व शस्रांचा साठा असल्याची माहिती मिळाली होती या माहितीवरुन यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून त्याच्या घरावर छापा मारून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या घरात शस्त्रसाठा व इतर साहित्य सापडले. त्यानंतर त्याच्यावर आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहीते पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर करीत आहेत.

हा साठा कारवाईत जप्त

बॉम्ब बनविण्याकरिता तयार केलेले 4 स्ट्रक्‍चर पाईप, 2 इलक्‍ट्रिक गन मशीन, गन पावडर, एका तेलकट कागदामध्ये गुंडाळलेले पावडर स्वरूपातील एक्‍सप्लोझिव्ह (हे स्फोटक असल्याचे संकेत श्‍वानाने दिलेते. मात्र, ते कोणत्या प्रकारचे एक्‍सप्लोझिव्ह आहे, याची माहिती तपासणीनंतर सांगता येईल), 2 तलवारी, 2 भाले, 59 डेटोनेटर (त्यात 4 इलेक्‍ट्रिक, 55 नॉन इलेक्‍ट्रिक), इलेक्‍ट्रिक स्वीच, इलेक्‍ट्रिक मोटार, बॅटरी, चिलखत, हेल्मेट.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.