एनबीएफसीसाठी भांडवल सुलभता
Updated On:

मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था आणि गृह वित्त कंपन्यांना मर्यादित काळासाठी 30 हजार कोटी रुपयांची भांडवल सुलभता उपलब्ध केली आहे. या संस्थांनी तीन वर्षासाठी या सवलतीची मागणी केली होती. मात्र रिझर्व्ह बॅंकेने केवळ तीन महिन्यांसाठी ही सवलत दिली आहे.
दीर्घकाळापासून भांडवल असुलभतेमुळे अडचणीत असलेल्या या संस्थांना यामुळे फारसा लाभ होणार नाही, असे सांगण्यात आले. यासाठी एक स्पेशल पर्पज व्हेईकल विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून तीन महिन्यांसाठी भांडवल सुलभता उपलब्ध करण्यात येणार आहे.



