Pooja Hegde : कॅाप चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये क्रेझ; अभिनेत्री पूजा हेगडेने सांगितल कारण, म्हणाली “मी लहानपणापासूनच पोलिसांच्या….

अभिनेता शाहिद कपूरचा ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘देवा’ आज शुक्रवारी रिलीज झाला आहे. शाहिद कपूरसोबत या चित्रपटात पूजा हेगडेही मुख्य भूमिकेत आहे. साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडेची ओळख असून तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. नुकतीच तिने आपल्या करिअरबद्दल काही गोष्टी एका मुलाखती दरम्यान सांगितल्या आहेत. तिला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायच्या असल्याचे तिने यावेळी बोलताना नमूद केले.
कॉप चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ का आहे? यावर पूजा बोलताना म्हणाली, ” मी स्वतः नेहमी पोलिसांच्या गणवेशातील लोकांकडे आकर्षित होत आली आहे. सर्व वयोगटातील लोकांना ॲक्शन आणि साहसाने भरलेले चित्रपट पाहिला आवडतात. चांगला चित्रपट हा नेहमीच चांगला असतो आणि तुम्ही चांगल्या चित्रपटाला दाबून टाकू शकत नाही. असंही होऊ शकतं की या जमान्यात लोकांना अशा प्रकारचे चित्रपट आवडत असतील, मला माहीत नाही. प्रेक्षकांना काय आवडेल हे सांगता येत नाही.
तिच्या करिअरच्या प्रवासाबद्दल पूजा हेगडे म्हणाली,” वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट करायचे आहेत. मी अनेक भाषांमध्ये काम करत आहे. माझा नेहमीच असा विश्वास आहे की जिथे आशय चांगला आशय असेल तिथे जायला हवे. मी माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकला आहे. माझा प्रवास नेहमीच असाच राहिलेला आहे. केवळ पॅन इंडिया चित्रपटांच्या बाबतीतच असे घडले नाही. तर मी तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मला नेहमीच प्रेमाने स्वीकारले गेले.” असल्याची तिने सांगितले. तसेच कौतुक केल्यानंतर यातून अधिक मेहनत करण्याची प्रेरणा मिळते असे देखील तिने बोलताना नमूद केले.
पूजाचा अपकमिंग प्रोजेक्ट
‘देवा’ नंतर पूजा हेगडे ‘रेट्रो’ चित्रपटात दिसणार आहे. देवा चित्रपटाचे दिग्दर्शन रोशन एंड्रयूजने यांनी केले आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि पूजा हेगडे यांच्याशिवाय पावेल गुलाटी, कुब्बरा सैत आणि प्रवेश राणा यांच्याही भूमिका आहेत. पूजा हेगडेच्या हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तिने २०१६ साली ‘मोहेंजो-दारो’ चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण केले. याशिवाय तिने ‘हाऊसफुल 4’, ‘राधे श्याम’, ‘सर्कस’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.





