आंदोलकांवरील लाठीमार निषेधार्ह

सातारा – जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमार निषेधार्ह असून याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणे हा नागरिकांचा अधिकार आहे. कुठलंही आंदोलन असो, त्यांच्यावर लाठीमार योग्य नाही. मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी मराठा आरक्षण मिळवून दिले ही वस्तुस्थिती आहे. परंतु, नंतरच्या काळात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सत्ता काळात हे आरक्षण न्यायालयात टिकले नाही. मराठा बांधवांनी संयम बाळगला पाहिजे. लाखोंनी मराठा मोर्चे काढले आहेत. झाडाचे पानही हलू दिल नाही. अशाच पद्धतीने आपली ताकद दाखवली पाहिजे. हिंसक होणे किंवा वेगळे वळण लागेल, अशी कृती होवू नये. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या प्रकरणाची चौकशी करून या प्रकरणातील दोषींवर शिक्षा होईल, असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केला.





