विविध संघटनांच्या वतीने हैदराबाद अत्याचार घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च

नगर – हैदराबाद येथे निर्भयावर सामुदायिक बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ मोची गल्ली व्यापारी असोसिएशन, अहमदनगर सोशल क्लब व विविध स्वयंसेवी संघटनांच्या वतीने कापड बाजार येथून सोमवारी (दि.2 डिसेंबर) रात्री कॅन्डल मार्च काढण्यात आला. निर्भयाला श्रध्दांजली वाहून सदर प्रकरणातील सर्व आरोपींना त्वरित फाशी देण्याची मागणी करण्यात आली.
मोची गल्ली येथून निघालेल्या कॅन्डल मार्चचा समारोप कापड बाजार येथील चौकात झाला. देशात बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होत नसल्याने हे प्रकरण वारंवार घडत आहे. दिल्ली निर्भया पासून ते हैदराबाद निर्भयापर्यंतच्या प्रकरणांनी संपूर्ण भारताचे मन हेलावले आहे. महिला व युवतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, याबाबत कठोर कायदा करुन आरोपींना तातडीने फाशी झाल्यास याची पुनरावृत्ती होणार नसल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
तर बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी देण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. यावेळी मोची गल्ली व्यापारी असो.चे अध्यक्ष मन्सूर शेख, नईम सरदार, हामजा चुडीवाला, वाजिद सय्यद, निरज काबरा, संतोष गोयल, योगेश बेद्रे, अन्सार पठाण, अकलाख शेख, बाळू चोपडा, सद्दाम चुडीवाला, पंकज राठोड, इकराम तांबटकर, बॉबी सरदार, नविद शेख, सिद्दीक तांबोली, शाहरुख शेख, सकिन सय्यद, मोहसीन शेख, दानियल शेख, आदी व्यापाऱ्यांसह युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





