प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – राजगुरुनगर नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या ६ व्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांनी तीन उमेदवारी अर्ज भरले. नगरसेवक पदासाठी २८ उमेदवारांनी ३२ अर्ज दाखल केले. आतापर्यंत नगराध्यक्षपदासाठी ३ तर नगरसेवक पदासाठी ४४ उमेदवारांनी ७६ अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शैलजा पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली. राजगुरुनगर नगर परिषद निवडणुक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी (दि.१५) नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष बापू थिगळे, राजगुरूनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष किरण आहेर, उद्योजक मंगेश गुंडाळ यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरले. (दि.१७) हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष बापू किसन थिगळे (अपक्ष), किरण चंद्रकांत आहेर (अपक्ष), मंगेश वसंत गुंडाळ (शिवसेना) यांनी उमेदवारी अर्ज भरले. प्रभाग एकमधून शोभा विजय थिगळे, रेवणनाथ मनोहर थिगळे, किशोर संभाजी थिगळे, साधना बापू थिगळे यांनी उमेदवारी अर्ज भरले. प्रभाग दोनमधून कुमार मच्छिंद्र सांडभोर यांनी दोन अर्ज व सुवर्णा देविदास सांडभोर यांनी यांनी उमेदवारी अर्ज भरला. प्रभाग तीनमधून मंदा दिलीप होले, पौलमी लोखंडे, योगीराज सुरेश करवंदे, राजेंद्र लक्ष्मण जाधव यांनी अर्ज भरले. प्रभाग पाच आणि सहा मधून आज कोणीही उमेदवारी अर्ज भरला नाही. प्रभाग सातमधून डॉ. सविता शेखर घुमटकर (२ अर्ज), वैभव शांताराम घुमटकर (२ अर्ज), तेजस महेंद्र घुमटकर, मेघा कौस्तुभ घुमटकर, वैभव लालासाहेब घुमटकर, मीनाक्षी संतोष भांगे, सुप्रिया अमित घुमटकर, केतन राजन घोरपडे यांनी अर्ज भरले. प्रभाग आठमधून आशा अरुण गुंडाळ, हेमंत अनंत खांगटे, स्वाती मनोज सावताडकर यांनी अर्ज भरले. प्रभाग नऊमधून सागर नागनाथ आवटे, अश्विनी सागर आवटे, तन्मय मारुती पाचारणे यांनी उमेदवारी अर्ज भरले. प्रभाग दहामधून अरविंद गायकवाड, सचिन अंकुश (२ अर्ज), मित्रसेन डोंगरे (दोन अर्ज), या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्या समर्थकांनी मिरवणूक रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. नगराध्यक्ष पदासाठी मंगेश गुंडाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेसमयी शिवसेनेत प्रवेश केलेले माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, माजी नगर सेवक मनोहर सांडभोर, शिवसेनेचे संघटक सचिन लांडगे आदी उपस्थित होते. किरण आहेर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करते समयी राजगुरुनगर सह बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, संचालक विनायक घुमटकर, बाजार समिती संचालक अशोक राक्षे आदी उपस्थित होते तर बापू थिगळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करते समयी खेड तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नरेंद्र थिगळे, बाजार समितीचे संचालक अशोक राक्षे, माजी संचालक रेवण एकविरा देवी ट्रस्ट अध्यक्ष शामराव थिगळे आदी उपस्थित होते.