Pune Municipal Corporation Election Results : पुणे महापालिका निवडणुकीच्या निकालात पहिल्या कलांपासून भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे पुण्यात ३ उमेदवार विजयी झाले आहेत. या सगळ्यात पुण्यातील प्रभाग क्रमांक ३९ मध्ये समान मतदान झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. प्रभाग क्रमांक 39 मध्ये पहिल्या व दुसऱ्या फेरीमध्ये उमेदवाराला दोन्ही मशीनमध्ये समान मतदान आलेले आहे. पहिल्या फेरीत 188 व दुसऱ्या फेरीत 206 मतदान असे दोन्हीही मशीनमध्ये सारखे मतदान आल्यामुळे मतमोजणीच्या वेळी त्या पक्षांनी आक्षेप घेऊन मतमोजणी थांबवली आहे. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. रुपाली धाडवे भाजप (BJP) आणि मनीषा मोहिते शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून रिंगणात आहेत, तर दोन्ही एकमेकांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत.