Madhya Pradesh Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर झाले असून प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. मात्र मध्य प्रदेशातील बैतुल येथील बसपा उमेदवार अशोक भलावी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बैतूल लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.
अशोक भलावी यांना मंगळवारी दुपारी छातीत तीव्र वेदना होत असल्याचे कुटुंबीयांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बुधवारी त्यांच्या गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यामुळे बैतूल जागेवरील निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.
या मतदारसंघातील 26 एप्रिल रोजी होणारे मतदान त्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. कायद्यातील तरतुदीनुसार निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली असून, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे जिल्हाधिकारी नरेंद्र सिंह रघुवंशी यांनी सांगितले.
#WATCH | Madhya Pradesh: Betual DM Narendra Kumar Suryavanshi says, “BSP candidate from Betul Ashok Bhalavi died due to cardiac arrest. We have informed the Election Commission about this. Under Section 52 of the Representation of the People Act 1951, we have postponed the second… https://t.co/STKqs1yu0v pic.twitter.com/K8O2bukO9n
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) April 9, 2024
अशोक भलावी कोण आहेत?
सोहागपूर गावात राहणारे अशोक भलावी हे भाजीचे व्यापारी होते. 50 वर्षीय अशोक भलावी यांनी पाचवीपर्यंतच शिक्षण घेतले होते. त्यांनी मागील लोकसभा निवडणूकही बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर लढवली होती. मात्र, याआधी त्यांनी गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने निवडणूक लढवली होती.
लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 52 नुसार, एखाद्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा नामांकनानंतर किंवा मतदानापूर्वी मृत्यू झाल्यास, त्या जागेवरील मतदान पुढे ढकलले जाते. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून त्या जागेसाठी निवडणुकीची तारीख जाहीर केली जाते. दरम्यान, मध्य प्रदेशातील 29 जागांसाठी 4 टप्प्यात मतदान होणार आहे.
हेही वाचा: